आयोगाने ठरविल्यानुसार,आतापर्यंत प्रसिद्ध कारण्यात आलेल्या सूचना व प्रारुपे यांचे एक संकलन भागधारकांच्या हितासाठी प्रकाशित केले जात आहे.
राज्यपालपदी नियुक्ती होऊन 5 सप्टेंबरला एक वर्ष झाले त्यानिमित्त वर्षभरातील कार्याचा सचित्र अहवाल या पुस्तकरूपाने मांडण्यात आला आहे.
Special Police Medal of Home Ministry to 10 Police Officers from Maharashtra
मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पहिल्यांदा या सभागृहात आलो असून महाराष्ट्रातील साधु-संत आणि समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण प्रयत्न करुया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केले.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ही स्वतंत्र (स्टँड अलोन) यंत्रे आहेत. कोणतेही रेडिओ तरंग ग्रहण अथवा प्रसारित (ट्रान्समिट) करण्याची त्यांची क्षमता नाही.
मुंबई : विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी राज्य आणि केंद्राचे पोलीस दल सुसज्ज झाले असून सुमारे तीन लाखाहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील राज्य शासकीय सेवा निवृत्ती वेतनधारक, कुटूंब निवृत्ती वेतनधारकांच्या याद्या निवृत्तीवेतन अदा करणाऱ्या सर्व बँकांना जिल्हा कोषागार कार्यालयाकडून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतुन निवृत्तीवेतन घेत असतील त्यांनी त्या बँकेत 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2019 या कालावधीत प्रत्यक्ष हजर राहुन यादीतील त्यांचे नांव पाहुन स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकाच्या समोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवावा तसेच पुनर्विवाह तसेच पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती ही नोंदवावी. सोबत पॅनकार्डची छायांकित प्रत बँकेत सादर करावी तसेच दुरध्वनी क्रमांक नोंदवावा.
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मत मोलाचे असुन त्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक असून मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपायुक्त दिलीप स्वामी यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे.
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक येथे प्रशिक्षणासाठी येणारे अधिकारी व प्रबोधिनीत वास्तव्यास असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या मुलभूत गरजासोबत पाण्याचे स्त्रोत कायम रहावे व भविष्यात पाण्याचे संकट उदभवू नये यासाठी 150 एकर परिसरात वसलेल्या पोलीस प्रबोधिनीमध्ये पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या मार्गदर्शनातून पोलीस प्रबोधिनी संचालक, श्रीमती अश्वती दोर्जे यांच्या प्रयत्नातून लॉर्ड इंडिया या कंपनीच्या अर्थसहाय्याने रेन वॉटर हार्वेस्टींग प्रोजेक्ट हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उदघाटन अपर मुख्य गृह सचिव संजयकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.