नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 17 : जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत जीटीपी महाविद्यालय येथे मतदार जागृती मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले. साडेसात हजार विद्यार्थ्यांनी मानवीसाखळीद्वारे विधानसभा निवडणूकीचा लोगो तयार करीत मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला.
- इयत्ता चौथीच्या पुस्तकामध्ये नव्या पिढीतील मुलामुलींना शिवाजी महाराजांचे कर्तृत्व समजावे म्हणून एक धडा होता... आता तो धडाच सरकारने काढून टाकला आहे
या जगात मुलांना अन्नाचा पुरवठा करण्यासंदर्भात जे देश आहेत त्याच्यामध्ये भारतातील मुलांना सगळ्यात कमी अन्न मिळतं. आपल्यापेक्षा नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा अन्नाचं प्रमाण मुलांना अधिक मिळतं
पंतप्रधान हे पद देशाच्या इज्जतीचं पद आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. आम्ही पंतप्रधान पदाची बेइज्जत कधी होवू देणार नाही. परंतु पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने सुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहिल अशी पावले टाकली पाहिजेत असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कन्नडच्या जाहीर सभेत दिला.
उद्योग नगरी असलेल्या पिंपरी चिंचवडची स्पोर्ट्स सिटी अशी ओळख निर्माण व्हावी यासाठी आमदार महेश लांडगे यांनी चालविलेले प्रयत्न स्तुत्य असून त्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील, असा विश्वास पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यांनी येथे व्यक्त केला.
चाळीसगाव दि. १३ ऑक्टोबर - मुख्यमंत्री सांगतात आमचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. परंतु कुस्तीचा राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे आणि ते म्हणतात आमच्याकडे पैलवान नाही आम्ही कुणाशी पण कुस्ती खेळत नाही आणि तुम्ही त्या भानगडीत पडूच नका अशी जोरदार उपरोधिक कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी चाळीसगाव येथील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांना लगावली.
‘करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव’अशी सध्याची भाजपाची परिस्थिती- शरद पवार उरळी कांचन ( पुणे-शिरुर) येथील जाहीर सभेत मोदींवर साधला निशाणा... मुंबई दि. ११ ऑक्टोबर – पुलवामाचा बदला हवाईदलाच्या सैनिकांनी घुसुन मारुन घेतला मात्र क्रेडिट कुणी घेतले? असा उपरोधिक टोला लगावतानाच 'करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव अशी सध्याची भाजपाची परिस्थिती आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उरळी कांचन येथील जाहीर सभेत केली.
चाळीसगाव दि. १० ऑक्टोबर - आताच्या निवडणुका ही भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक घडी बसवण्याची शेवटची संधी असेल. अन्यथा महाराष्ट्राची आर्थिक दुर्दशा झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला भरघोस मतदान करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी चाळीसगाव येथील जाहीर सभेत केले.
नवाब मलिक पदयात्रेच्या माध्यमातून थेट जनतेच्या दारात... आबालवृद्धांसहीत महिलांचा पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग... मुंबई दि. ९ ऑक्टोबर -राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष व अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नवाब मलिक यांचा मतदारसंघात झंझावाती दौरा सुरु असून पदयात्रेच्या माध्यमातून थेट जनतेमध्ये जावून आशिर्वाद घेतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.
जे दिलेली आश्वासने पूर्ण करत नाही त्यांना खुर्चीवर राहण्याचा हक्क नाही - शरद पवार अकोला - बाळापुर दि. ९ ऑक्टोबर - मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफी करणार अशी घोषणा केली मात्र ही घोषणा फसवी निघाली. त्यामुळे जे आश्वासन पूर्ण करत नाही त्यांना खुर्चीवर राहण्याचा हक्क नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले.
रयतेचे राज्य आणण्यासाठी १४ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेत स्वराज्याची स्थापना केली. तीच प्रेरणा घेऊन संयुक्त पुरोगामी महाआघाडीचा हा शपथनामा आज जाहीर करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. संयुक्त पुरोगामी महाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली. शपथनामामधील ठळक मुद्दे - शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी, तरुण, सुशिक्षित बेरोजगारांना ५ हजार रुपये मासिक भत्ता, केजी टू पीजी मोफत शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासकीय व अनुदानित महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे मोफत शिक्षण, उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज, राज्यातील प्रत्येक नागरीक आरोग्य विम्याच्या कक्षेत, कामगारांचे किमान वेतन २१ हजार रुपयांवर, मराठी भाषा सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार मराठी ही ज्ञानभाषा बनविण्याच्या उद्देशाने स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ स्थापना, सर्व महानगरपालिकांच्या हद्दीतील ५०० चौरस फूटापर्यंत घर असलेल्या नागरिकांना मालमत्ता कर माफ, नव्या उद्योगात ८० टक्के नोकर्या स्थानिक भूमिपुत्रांना देण्यासाठी विशेष कायदा, मानव विकास निर्देशांक उंचविण्यावर भर, याचा समावेश आहे.
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात नवाब मलिक यांची पदयात्रा... ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत... जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद... मुंबई दि. ६ ऑक्टोबर -मुंबई अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात आज नवाब मलिक यांनी पदयात्रा काढली. या पदयात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाच शिवाय ठिकठिकाणी औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काँ.अँड.दत्तात्रय गांगुर्डे यांचा चांदवड मधुन अर्ज दाखल
अजितदादा पवार यांचा बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल... बारामतीने पुन्हा एकदा दाखवून दिले दादावरील प्रेम ;अर्ज दाखल करताना अलोट गर्दी... मुंबई दि. ४ ऑक्टोबर -राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा कोथरूडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल सर्व स्तरांमधील नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, खा. गिरीश बापट, खा. संजय काकडे, आ. मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शशिकांत सुतार, कोथरूडमधील शिवसेनेचे माजी आ. चंद्रकांत मोकाटे आणि पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. भाजपा शिवसेना महायुतीचे हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
भाजपा नेते सुनिल शेळके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश... मावळमधून राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी जाहीर... मुंबई दि. ३ ऑक्टोबर - मावळचे भाजपा नेते आणि मावळचे माजी उपनगराध्यक्ष सुनिल अण्णा शेळके यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सेना- भाजपाच्या नेत्यांची प्रवेश करण्यासाठी रांग लागली असून आज सकाळी पालघरचे शिवसेना आमदार अमित घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. तर मावळचे भाजपा नेते सुनिल शेळके यांनी आज दुपारी आपल्या हजारो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
धनंजय मुंडेंचा परळीतून उमेदवारी अर्ज दाखल दुपारी रॅली आणि सभा घेवून शक्तीप्रदर्शन परळी दि.३ ऑक्टोबर - परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडेंनी आज सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान दुपारी परळी शहरातून भव्य प्रचार रॅली व जाहीर सभेने जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
पालघरचे शिवसेना आमदार अमित घोडा राष्ट्रवादीत... मुंबई दि. ३ ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू झाले असून आज पालघरचे शिवसेना आमदार अमित घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
ही प्रचंड गर्दी म्हणजे विजयासाठी जनआशीर्वाद! उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रदीप शर्मा यांच्यासोबत जनसागर ज्यांच्यासाठी मी या लढाईत उतरलो आहे ती विरार, नालासोपाराची जनताच आज माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येथे जमली आहे. आदिशक्ती जीवदानी देवीचे मी कालच आशीर्वाद घेतले आहेत. आता या जनसागरानेही मला विजयासाठी जनआशीर्वाद दिला आहे, असे भावपूर्ण प्रतिपादन शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी गुरुवारी नालासोपारा येथे केले.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना आरपीआय (अ) रासप महायुतीच्या अधिकृत उमेदवार आ. प्रा.सौ. देवयानीताई फरांदे यांनी आज नाशिक मध्य मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याआधी कार्यकर्त्यांनी घोषणा देत जल्लोष केला. यावेळी खासदार हेमंत अप्पा गोडसे, महापौर रंजना भानसी, भाजप शहराध्यक्ष गिरिषजी पालवे, भाजपाचे ज्येष्ठ नेते रघुनाथजी कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष सुनिलभाऊ बागूल,सरचिटणीस पवन भगुरकर,
सीमाताई हिरे यांनी नाशिक पश्चिम मतदार संघासाठी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला
शरद पवारांचा आजपासून निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा... उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर येथे जाहीर सभा... मुंबई दि. १ ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा झंझावाती प्रचार दौरा आजपासून सुरू होत आहे. आज मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी ४ वाजता भूम, उस्मानाबाद येथे जाहीर सभा घेऊन उपस्थितांशी संवाद साधणार आहे.
इस्लामपुर - वाळवा दि. १ ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पहिला उमेदवारी अर्ज प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दाखल केला. आज अर्ज दाखल करताना इस्लामपूर, वाळवा मतदारसंघातील जनता प्रचंड व मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. वाळवा तालुका पुर्णपणे राष्ट्रवादीमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
भाजपची नागपुरची उमेदवार यादी १) नागपुर दक्षिण पश्चिम - श्री देवेन्द्र गंगाधर फडणवीस २) नागपुर उत्तर - श्री संदीप जाधव ३) नागपुर दक्षिण - श्री मोहन गोपाराव मते ४) नागपुर पश्चिम - सौ वर्षा जयंत ठाकरे ५) नागपुर मध्य - श्री प्रवीण प्रभाकर राव डटके ६) नागपुर पूर्व - श्री कृष्णा खोपडे
खा.उन्मेश पाटील यांचा युवकांशी कॉफी विथ युथ – युवा संवाद. नाशिक: भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस व जळगाव लोकसभा क्षेत्राचे खा.उन्मेश पाटील यांनी पंचवटीतील हिरावाडी येथील श्री सप्तश्रृंगी आयुर्वेदिक महाविदयालय येथे नवमतदार व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. युवा मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर भाजपाचे युवा खासदार युवकांशी कॉफी विथ युथ या कार्यक्रमांच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. तसेच भारतीय जनता पार्टी कडून युवकांना काय अपेक्षा आहेत. आगामी काळामध्ये महाराष्ट्र राज्याचा विकास कशा पध्दतीने व्हावा याच्या कल्पना जाणून घेत युवकांनी विचारलेल्या प्रश्नांना खा.पाटील यांनी मनमोकळयापणाने उत्तरे दिली.