आजच्या विद्यार्थ्यांसाठी समर्थांचे विचार पोषक वातावरणनिर्मिती करण्यात मोलाची भूमिका पार पाडू शकतात. त्यांच्या विचारांची जोड विद्यार्थी आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास करण्यास लागल्यास आयुष्य यशस्वी बनू शकते असे प्रतिपादन प्रमुख वक्त्या डॉ विनिता परांजपे यांनी केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिकचे पोलिस निरीक्षक आणि नाशिक पश्चिम जिल्ह्याचे निवडणूक अधिकाऱ्याची बदली केली
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना नाशिक शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. परिणामी शेवटच्या काही शिल्लक तासांच्या प्रचारावर पावसाचे सावट पडण्याची शक्यता आहे.
नाशिक, ता. 21 : नाशिकमध्ये आज 100 वर्षांच्या आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला. सखुबाई नामदेव चुंबळे असे त्यांचे नाव आहे. 1960 पासून ते आजपर्यंत 14 विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नाशिकव्यतिरिक्त राज्यातील अनेक भागांत मतदानाचा उत्साह दिसून आला. ज्येष्ठ, अपंगांनी आवर्जून मतदानात भाग घेतला.
विधानसभेच्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील अनेक विदयमान आणि वर्षानुवर्ष सत्ता राखलेल्यांना नाशिककरांनी घरचा रस्ता दाखवला आहे. तर काही आमदारांना आपल्या जागा राखण्यात यश आले आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हयात 2 जागा वाढल्या आहेत, तर मालेगावमध्ये एमआयएमचा प्रवेश झाला आहे.