आपल्या देशातील मुलांना अन्न खायला मिळत नाही ही बातमी जागतिक पातळीवर छापून येते एवढी बेईज्जत या लोकांच्या राजवटीत - शरद पवार

आपल्या देशातील मुलांना अन्न खायला मिळत नाही ही बातमी जागतिक पातळीवर छापून येते एवढी बेईज्जत या लोकांच्या राजवटीत - शरद पवार

या जगात मुलांना अन्नाचा पुरवठा करण्यासंदर्भात जे देश आहेत त्याच्यामध्ये भारतातील मुलांना सगळ्यात कमी अन्न मिळतं. आपल्यापेक्षा नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा अन्नाचं प्रमाण मुलांना अधिक मिळतं

आपल्या देशातील मुलांना अन्न खायला मिळत नाही ही बातमी जागतिक पातळीवर छापून येते एवढी बेईज्जत या लोकांच्या राजवटीत - शरद पवार



नाशिक - निफाड दि. १७ ऑक्टोबर - या जगात मुलांना अन्नाचा पुरवठा करण्यासंदर्भात जे देश आहेत त्याच्यामध्ये भारतातील मुलांना सगळ्यात कमी अन्न मिळतं. आपल्यापेक्षा नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा अन्नाचं प्रमाण मुलांना अधिक मिळतं... ही भारतासारख्या देशाला बातमी चांगली आहे का? असा संतप्त सवाल करतानाच जो अन्नधान्याची निर्यात जगात करतो त्या देशातील मुलांना अन्न खायला मिळत नाही. ही बातमी जागतिक पातळीवर आपल्याबद्दल छापून येते एवढी बेईज्जत या लोकांच्या राजवटीत केली जाते अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी निफाड येथील जाहीर सभेत व्यक्त केली.



आज जाहीर झालेल्या या आकडेवारीच्या अहवालावर बोलताना शरद पवार यांनी जोरदार टीका केली.



हे चित्र बदलायचे की नाही अशी विचारणा शरद पवार यांनी करतानाच आपण सत्तेवर असलेल्या सरकारला बदललं पाहिजे असे आवाहनही शरद पवार यांनी केले. 



निफाड येथे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभा पार पडली.



शेतकऱ्यांची दैना झालीय... शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत... कारखाने आजारी पडले आहेत... मंदीचे संकट आलेले आहे... लोकांची रोजीरोटी जातेय... आज ही सगळी संकट आज महाराष्ट्रात आली आहेत त्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याची धमक भाजपमध्ये नाही त्यामुळे यांना सत्तेपासून बाजुला करणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहनही शरद पवार यांनी केले.



प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याची पावले टाकली ते लोकांना पसंत नाही असेही शरद पवार म्हणाले. 



दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ऑफिस आहे. कॉंग्रेसचं कधी राज्य आलं तर कधी पराभव झाला. असे अनेक चढउतार पाहिलेल्या कॉंग्रेसच्या कार्यालयावर धाड घालत चार लोकांना ताब्यात घेवुन चौकशी सुरु आहे. निवडणूक सुरु असताना असा प्रकार घडणं योग्य नाही. मलाही त्रास देण्याचा प्रयत्न झाला असे सांगतानाच ईडीचा घडलेला किस्सा सांगितला.



ही काय राज्य चालवायची पद्धत आहे. कोण कुणाच्या ओळखीचा आहे एवढ्या मुद्दयावर तुम्ही गुन्हा दाखल करता... सत्ता येते... पण 

सत्ता आल्यावर पाय जमिनीवर ठेवायचे असतात आणि डोकं जाग्यावर ठेवायचं असतं असा सल्ला शरद पवार यांनी भाजप सरकारला दिला.



देशाचे पंतप्रधान भारतात फिरतात किंवा बाहेर परदेशातही जातात. पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा आणि मान त्यांनी व आम्हीही ठेवला पाहिजे. ते परदेशात जावून बोलतात ती देशाची भूमिका असते. तो देशाचा विचार असतो, पंतप्रधान देशाचा, गृहमंत्री देशाचा असतो. आज एका वर्तमानपत्रात बातमी आलीय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतातील अर्थव्यवस्था ही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि गव्हर्नर यांच्यामुळे डबघाईला आली. तुम्ही अमेरिकेत जावून देशातील महत्वाच्या व्यक्तींबद्दल टिका टिप्पणी कशाला करता. याची जाण यांना नाही का असा सवालही शरद पवार यांनी केला.



दरम्यान शरद पवार यांनी मोदी - शहा आणि मुख्यमंत्र्यांवर तोफ डागतानाच पुन्हा एकदा सत्ता द्या. मी काही सत्तेत बसणार नाही परंतु तुमच्या हिताची जपणूक केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा शब्द शरद पवार यांनी जनतेला दिला.

Comments:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More News