All News

राज्यातील १०६१ पोलिस अंमलदार झाले पोलिस उपनिरीक्षक

राज्यातील १०६१ पोलिस अंमलदार झाले पोलिस उपनिरीक्षक

मुंबई, दि. २० ऑक्टोबर  : राज्यातील १०६१ पोलिस अंमलदार यांची पोलिस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. नवीन पदावर अधिक जोमाने कार्यरत रहा, तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे, अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुखयांनी पदोन्नत झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.


पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील १०६१ पोलिस अंमलदारांना पोलिस उप निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्याचे आदेश जारी केले. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी अधिक जबाबदारीने नागरिकांची सेवा करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांचे हार्दिक अभिनंदन, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

Advertisement

test 4 MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd