All News

यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात न होता 'या' ठिकाणी होणार

यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात न होता 'या' ठिकाणी होणार

मुंबई, दि. २२ ऑक्टोबर :  राज्यात कोरोनाचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. कोरोनामुळे सर्व सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा कसा होणार याबाबत चर्चा सुरू आहे.

दरम्यान, यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार आहे. पहिल्यांदाच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावर होणार नाही आहे. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. या दसरा मेळाव्याचे महत्व राजकीय आणि सांस्कृतीक देखील आहे. त्यामुळे दसरा मेळावा कसा घ्यायचा याबाबत काही दिवसांपासून नियोजन सुरु होते.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test 4 Highclonoid Softec Pvt Ltd IBPS