All News

सिंचन घोटाळयाचा प्रमुख साक्षीदार राष्ट्रवादी फोडला : राम शिंदे

सिंचन घोटाळयाचा प्रमुख साक्षीदार  राष्ट्रवादी फोडला : राम शिंदे

अहमदनगर, दि.२४ ऑक्टोबर :  एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर भाजपमधील अनेकांच्या त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा प्रमुख साक्षीदार तरी आता त्याचा उपयोग होणार नाही, या घोट्याळ्यातील आरोपींवर निश्चित कारवाई होईल, असं म्हणत भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.


राम शिंदे म्हणाले की, 'एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना सिंचन घोटाळ्याचे ते प्रमुख होते. ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात असून खडसेंची साक्ष होऊन गेली आहे. त्यामुळे आता या साक्षीदाराचा काही उपयोग होणार नाही'. 10 ते 12 आमदार संपर्कात आहेत, असं जयंत पाटील म्हणाले होते. परंतु एकही आमदार, माजी आमदार एकनाथ खडसेंसोबत गेला नाही. तसंच कोणीही भाजप सोडणार नसल्याचा दावाही शिंदे यांनी केला आहे. दरम्यान,   10 ते 12 आमदार संपर्कात आहेत, असं जयंत पाटील म्हणाले होते. परंतु एकही आमदार, माजी आमदार एकनाथ खडसेंसोबत गेला नाही. 

Advertisement

test 4 MahaExam IBPS Highclonoid Softec Pvt Ltd