All News

फडणवीस सरकारचा 1250 कोटींचा घोटाळा

फडणवीस सरकारचा 1250 कोटींचा घोटाळा

  • चौकशी समितीचा ठपका; 33 कोटी वृक्ष लागवडीचा पंचनामा    

मुंबई, दि. २३ मार्च :  देवेंद्र फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत 125 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबवलेल्या या मोहिमेत प्रत्यक्ष खर्च लपवण्यात आला. तब्बल 1250 कोटींचा हा घोटाळा झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. 


अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुनंगटीवार यांनी राबवलेल्या वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली होती. 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्याचे जाहीर करण्यात आले होते. चौकशी समितीने या मोहिमेत 1250 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवला आहे. प्रत्यक्ष खर्च तीन हजार 688 कोटी झाला आहे; पण विधिमंडळामध्ये दोन हजार 438 कोटी रुपये खर्च दाखवला आहे. तसेच या मोहिमेसाठी 250 कोटी जाहिरातीवर खर्च करण्यात आला आहे. माहिती जनसंपर्क विभागात हे टेंडर रेकॉर्डवर नसल्याचेही समोर आले आहे. 


राज्यात  2016 ते 2017 आणि 2019-20 या कालावधीत वन विभागाने वृक्ष लागवड योजनेत 28.27 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. ऑक्टोबर 2020 अखेरीस त्यातील 75.63 टक्के रोपे म्हणजे 21 कोटी जिवंत आहेत, त्याची देखभाल करण्यात येत आहे. 2017 ते 2019 कालावधीत वन विभागाने शासकीय यंत्रणा, शैक्षणिक संस्था,उद्योगसमूह, खासगी व्यक्ती यांच्या माध्यमातून 50 कोटी वृक्ष लावण्याची मोहीम राबाबण्यात आली होती. ही मोहीम राबवण्यासाठी 2016-17 ते 2019-20 दरम्यान दोन हजार 429.78 कोटी निधी मिळाला होता, ता सर्व वापरण्यात आला. 25 टक्के रोपे जिवंत का राहिली नाही याची चौकशी करावी, अशी मागणी मंत्री दत्तात्रय भारणे यांनी अधिवेशनात केली होती. त्यानंतर वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी केली जाईल. पुढील सहा महिन्यांत चौकशी अहवाल तयार होणार असून तो सादर केला जाईल’, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.

Advertisement

MahaExam test 4 Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd