lokshahiaghadi
lokshahiaghadi
  • मुख्यपृष्ठ
  • E-Paper
  • नाशिक शहर
    • नाशिक
    • पंचवटी
    • नाशिक रोड
    • नाशिक पूर्व
    • नाशिक पश्चिम
    • नवीन नाशिक
    • सातपूर
  • नाशिक ग्रामीण
    • निफाड
    • येवला
    • चांदवड
    • नांदगाव
    • बागलाण
    • सिन्नर
    • दिंडोरी
    • कळवण
    • मालेगाव बाह्य
    • मालेगाव मध्य
    • देवळाली
    • इगतपुरी
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
    • मुंबई
  • प्रशासकीय
  • COVID-19
  • साहित्य संमेलन
  • मंथन
  • राष्ट्रीय
  • विधानसभा
  • इतर
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • मनसा स्मरामी
    • शेती
    • अध्यात्म
    • जीवन शैली
    • तरूणाई
  • Home
  • News Details
  • News Details

All News

COVID Vaccine : केंद्र सरकार लसीकरणसाठी राज्यांना १२ कोटी डोस देणार

COVID Vaccine : केंद्र सरकार लसीकरणसाठी राज्यांना १२ कोटी डोस देणार

नवी दिल्ली, दि. ३० मे : महामारीचा प्रसार आणि व्यवस्थापन याबरोबरच टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि कोविड  योग्य वर्तन  यासाठी देशभरातील लसीकरण मोहिमेचा लसीकरण हा  एक अविभाज्य स्तंभ आहे. केंद्र सरकार राज्ये / केंद्रशासित प्रदेशाना कोविड लस विनामूल्य पुरवत आहे. उदार आणि वेगवान देशव्यापी कोविड 19 लसीकरण धोरण  1 मे  2021 पासून लागू करण्यात आले आहे ज्यामध्ये उपलब्ध मात्रांपैकी 50 टक्के मात्रा  राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशांना पुरवठा करण्यासाठी राखून ठेवल्या आहेत.  तर उर्वरित 50 टक्के राज्य / केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयाना  लस उत्पादकांकडून थेट खरेदीसाठी उपलब्ध आहे.

राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारकडून पुरवण्यात येणारी सामुग्रीचे वितरण हे  वापर पद्धती, लोकसंख्या आणि वाया गेलेल्या लसी  यावर ठरवले जाते.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या 17 मे 2021, 27 मे 2021 आणि 29 मे 2021 च्या पत्रांनुसार केंद्र सरकारकडून जून 2021 च्या संपूर्ण महिन्यासाठी लसींच्या उपलब्धतेची माहिती राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना आगाऊ  पुरवली आहे.

जून  2021 महिन्यासाठी आरोग्य सेवा कामगार (एचसीडब्ल्यू),आघाडीवरचे  कामगार (एफएलडब्ल्यू) आणि 45 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीसाठी  प्राधान्य गट लसीकरणासाठी कोविड प्रतिबंधक लसींच्या  6.09 कोटी (6,09,60,000)  मात्रा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या जातील.  याव्यतिरिक्त, राज्य / केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांना थेट खरेदीसाठी  5.86 कोटी  (5,86,10,000)पेक्षा जास्त मात्रा उपलब्ध असतील. त्यामुळे जून 2021 मध्ये 12 कोटी  (11,95,70,000) मात्रा राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमासाठी उपलब्ध असतील.

या वाटपाचे वितरण वेळापत्रक आगाऊ  सामायिक केले जाईल. राज्यांना विनंती करण्यात आली आहे की  वाटप केलेल्या मात्रांचा तर्कसंगत आणि न्याय्य उपयोग सुनिश्चित करण्याचे  आणि लसीचा अपव्यय कमी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत.

Prev Post

Next Post

Advertisement

test2 Highclonoid Softec Pvt Ltd Bharti_pawar IBPS

Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.

  • Home
  • Contact