All News

मेट्रो कारशेडचे काम थांबवा, केंद्राचा ठाकरे सरकारला आदेश

मेट्रो कारशेडचे काम थांबवा, केंद्राचा ठाकरे सरकारला आदेश

नवी दिल्ली, दि. ०३ नोव्हेंबर  : आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारनं आता मेट्रोचं कारशेड थेट कांजूरमार्ग येथे हलविण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने खो घातला आहे. केंद्रानं कांजूरमार्गमधील जागेवर आपला दावा सांगितला आहे. तसं पत्र केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागानं (डीपीआयआयटी) राज्य सरकारला पाठवले आहे. 


कांजूरमार्गमधील ज्या १०२ एकर सरकारी जमिनीवर मेट्रो ३ चे कारशेड उभारण्यात येत आहे, ती जागा मीठागराची असून मीठ संचालनालय गुजरात केडरचे सनदी अधिकारी गुरुप्रसाद मोहपात्रा प्रमुख असलेल्या डीपीआयआयटीला रिपोर्ट करते. जिल्हाधिकारी आणि एमएमआरडीएच्या अनुचित आणि एकतर्फी कारवाईमुळे केंद्र सरकारचे मोठे नुकसान झाले असून केंद्र सरकारच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ही जमीन एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, असे मोहपात्रा यांच्या स्वाक्षरीने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.


Advertisement

IBPS MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd test2