All News

बायडेन यांच्या सभेत साताऱ्यातील शरद पवारांच्या त्या सभेची आठवण

बायडेन यांच्या सभेत साताऱ्यातील शरद पवारांच्या त्या सभेची आठवण

फ्लोरिडा, दि. ३० ऑक्टोबर : जो बायडन यांचे भाषण सुरु असताना पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवले. या सभेनंतर जो बायडेन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला. 'वादळ संपेल आणि नवीन दिवसाची सुरुवात होईल', अशी कॅप्शन जो बायडेन यांनी फोटोखाली लिहली आहे. मात्र, पावसाचा जोर वाढल्यानंतर जो बायडेन यांना आपले भाषण आवरते घ्यावे लागले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात आपले भाषण सुरुच ठेवले होते. त्यांची ही सभा खूप गाजली होती. आता जो बायडेन यांच्या पावसातील भाषणाची तुलना शरद पवारांच्या भाषणाशी केली जात आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. जेंव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेंव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे!,'' असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd IBPS Highclonoid Softec Pvt Ltd