All News

ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी हल्ला

ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी हल्ला

व्हिएन्ना, दि. ०३नोव्हेंबर : युरोपियन देश ऑस्ट्रियाच्या  व्हिएन्ना शहरात हल्लेखोरांनी गोळीबार केला. सीएनएनच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रिया सरकारनं हा नियोजित दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.


दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांनी लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यापासून दूर राहा असंही म्हटलं आहे. ऑस्ट्रियाच्या गृहमंत्र्यांनी हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असून लोकांना घऱाबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. तसेच संशयित दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या विशेष दलांना बोलावण्यात आल्याची माहिती दिली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


Advertisement

MahaExam IBPS test2 Highclonoid Softec Pvt Ltd