All News

कृण्वंतो विश्वं आर्यम.. लोहार पिता पुत्रांची नाशिक -कन्याकुमारी - कालडी - नाशिक साडेतीन हजार कि.मी सायकलिंग मोहीम

कृण्वंतो विश्वं आर्यम.. लोहार पिता पुत्रांची नाशिक -कन्याकुमारी - कालडी - नाशिक साडेतीन हजार कि.मी सायकलिंग मोहीम

नाशिक दि.31: संपूर्ण जगा ला विश्वबंधुत्वाची शिकवण दिलेल्या स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे भारावलेपण घेऊन नाशिक च्या गणेश पांडुरंग लोहार यांनी पुत्र अथर्व व वेदान्तसह तब्बल साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.      भारतीय संस्कृती व योगाचे महत्व लोकांना समजून सांगण्यासाठी लोहार पिता पुत्रांनी ही सायकल मोहीम केली. वैयक्तिक आरोग्याबरोबर सामाजिक आरोग्य अबाधित ठेवणे ,

माझ्या जीवनाला आकार देणारे परमपूजनीय दादाजी,वैदिक परंपरा पुनर्जीवित करणारे श्रीमद आद्य शंकराचार्य, व भारतीय तत्वज्ञान जगासमोर आणणारे स्वामी विवेकानंद यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करण्याच्या भूमिकेतून ही मोहीम राबवण्यात आली. 

गणेश पांडुरंग लोहार व त्यांची मुले अथर्व व वेदांत या  तिघांनी नाशिकमधून  १० ऑक्टोबर २०२० ला सकाळी ६ वाजेपासून सायकलिंगला सुरुवात केली. दररोज सरासरी १५० ते २०० कि.मी. चे सायकलीन्गचे टार्गेट होते. साधारणत: ३५०० कि.मी.चे  अंतर २५ दिवसात पूर्ण करण्याचा मानस होता व त्यात त्यांनी यश मिळविले. नाशिक-मंचर-पुणे-सातारा-कागल-कित्तूर-हावेरी-चित्रदुर्ग-तुम्कुरू-होसूर-सालेम-अरावाकुरुची-मदुराई-तिरुनेलवेली-कन्याकुमारी-व्वायाकाल-कालडी-तीरुरांगडी-कान्नापुराम-उडुपी-मुर्धेश्वर-कित्तूर-कागल-सातारा-मंचर-नाशिक असा प्रवास पूर्ण करून आजच ते नाशिकमध्ये परत आले. हा सर्व अद्भूत अनुभव होता अशी भावना लोहार पिता पुत्रांनी लोकशाही आघाडीचे प्रतिनिधी प्रथमेश महाजन यांच्याशी बोलताना व्यक्त केली.

Advertisement

test 4 MahaExam IBPS Highclonoid Softec Pvt Ltd