All News

पुण्यातील सॅनिटायझर कंपनीत अग्नितांडव; 18 कामगारांचा मृत्यू

पुण्यातील सॅनिटायझर कंपनीत अग्नितांडव; 18 कामगारांचा मृत्यू

पुणे, दि. ८ जून : पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये असणाऱ्या उरवडे याठिकाणी एका सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपनीला लागलेल्या आगीत 15 महिलांसह एकूण 18 जणांनी जीव गमावला आहे. दरम्यान या कंपनीमध्ये लागलेली आग नियंत्रणात आणली असली तरी काही ठिकाणी अद्यापही काही भागात आग धुमसत आहे.

मुळशी एमआयडीसीतील उरवडे गावात एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजिस कंपनी आहे. संबंधित कंपनीत सॅनिटायझरसह विविध उत्पादने तयार केली जातात. सोमवारी 40 ते 50 कामगार कंपनीत काम करीत होते. त्यावेळी शॉर्टसर्किटमुळे एका विभागात अचानक आग लागली. सॅनिटायझरमुळे आग वेगाने पसरल्यामुळे 37 कामगार अडकले होते. त्यानंतर एमआयडीसी आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या 9 गाडय़ा आणि 11 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, प्रचंड धुराच्या लोटामुळे आग विझविण्यात अडचण निर्माण झाली होती. अथक प्रयत्नानंतर जवानांनी आग विझवून बेपत्ता कामगारांची रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू ठेवली होती. रात्री आठ वाजेपर्यंत 18 कामगारांचे मृतदेह आढळून आले.

Advertisement

test2 Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam test 4