All News

मी गेल्यावर तरी कीव येईल... मराठा समाजातील विद्यार्थ्यांची आत्महत्या

मी गेल्यावर तरी कीव येईल... मराठा समाजातील विद्यार्थ्यांची आत्महत्या

बीड, दि.०१ ऑक्टोबर :   बीडच्या केतुरा येथील विद्यार्थ्याने गळफास घेतला आहे. मी मेल्यानंतर तरी केंद्रआणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि तेव्हा माझं मरण सार्थक होईल, असं  सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.


नीट परीक्षेत कमी गुण मिळाले त्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता पुढे शिक्षणाची वाट कठीण झाल्यामुळे एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल (३० सप्टेंबर) घडली. विवेक राहाडे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विवेक याने नुकतीच नीट परीक्षा दिली होती. मात्र, विवेकला परीक्षेत कमी गुण मिळतील असे वाटत होते. याच नैराश्यातून विवेकने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.


मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने पुढच्या शिक्षणाची वाट कठीण झाल्याने विवेकने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं तर विवेकचा नंबर लागला असता, अशी भावना विवेकच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Advertisement

test2 Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd