All News

नागपूरात कमळाच्या पाकळ्यांना गळती

नागपूरात कमळाच्या पाकळ्यांना गळती

नागपूर, दि. १० मार्च : नागपूर जिल्ह्यातील वाडीमध्ये भाजपला मोठे खिंडार पडले आहे. वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह भाजपच्या 31 पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिला. सर्व पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 


भाजपमधील अन्यायकारक धोरणामुळे पक्ष सोडल्याचे या पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. वाडी नगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना, या फुटीमुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानला जात आहे. भारतीय जनता पक्षात अन्यायकारक आणि पक्षपाती कार्यप्रणाली असल्याचा आरोप करत जिल्हा भाजपचे माजी महामंत्री, माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे आणि त्यांच्या सहका-यांनी पक्ष सोडला. याचा वाडीच्या आगामी नगरपालिका निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 


भाजप नेते संजय साडेगावकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचा झेंडा हाती धरला. साडेगावकर हे परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भाजपला जोरदार धक्के देताना दिसत आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे भाजपला जोरदार धक्का बसला होता. शिवसेनेने भाजपला आणखी एक धक्का दिला. भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अँटॉप हिल वडाळा (पूर्व) येथील अनिल कदम आणि दोन वेळा नगरसेवक राहिलेल्या प्रेसिला कदम तसेच भाजप प्रणित बेस्ट संघटनेचे कार्याध्यक्ष विवेक घोलप यांनी ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेते प्रवेश केला.

Advertisement

IBPS test 4 Highclonoid Softec Pvt Ltd IBPS