All News

आता भाजपला ताकद दाखवतो, उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी

आता भाजपला ताकद दाखवतो, उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी

जळगाव, दि. ०२ नोव्हेंबर :  गेल्या अनेक वर्षांच्या नाराजीनंतर एकनाथ खडसे यांनीभाजपला सोडचिट्ठी देत नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर त्यांचे अनेक समर्थक देखील राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसतायेत. अशातच आज जळगावात भाजपच्या ६० पदाधिकाऱ्यांनी खडसे यांच्या उपस्थितीत हातावर 'घड्याळ' बांधलं. 


राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात भारतीय जनता पक्षाला राजकीय हादरे देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जळगावात विस्तार करण्याचं वचन त्यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी दिलं होतं. भारतीय जनता पक्षाचा एकही पदाधिकारी पक्ष सोडणार नाही असं म्हणणाऱ्या भाजपच्या संकट मोचकांना म्हणजे गिरीश महाजनांना मोठा धक्का दिला आहे. कारण जिल्ह्यातील एक-दोन नव्हे तर तब्बल ६० भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.  त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला राजकीय धक्के बसण्यास आणि राष्ट्रवादीचा पक्ष विस्तार होण्यास सुरुवात झाली आहे असंच म्हणावं लागेल.

Advertisement

test2 MahaExam IBPS IBPS