All News

सरकारने जाहीर केलेली मदत पुरेशी नाही -पंकजा मुंडे

सरकारने जाहीर केलेली मदत पुरेशी नाही -पंकजा मुंडे

बीड, दि. २५ ऑक्टोबर  : राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे बेजार झाला आहे. सरकारकडे मी मदतीची मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मदत जाहीर केली. १० हजार कोटींची मदत सरकारने जाहीर केली आहे. पण, ती पुरेशी नसून शेतकऱ्यांचे नुकसान मोठे असल्यामुळे सरकारने आणखी मदत जाहीर करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.

 


सावरगावातील भगवान गडावर दसऱ्यानिमित्त मेळावा आयोजित करण्यात येतो. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ही परंपरा पंकजा पुढे यांनी पुढे सुरू ठेवली असून, पंकजा मुंडे यांनी आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. मागील अनेक दिवसांपासून अशी चर्चा सुरू होती की, पंकजा घरी बसल्या आहेत. गोपीनाथ मुंडे गेले आहेत. त्याचबरोबर अपप्रचार देखील सुरू होता. पण, कोरोना काय मी आणला का? कोरोनात जबाबदारीने वागले. साहेबांच्या जयंतीला परवानगी मागितली, तेव्हा मला विनंती केली. पण, मी भगवान बाबांच्या दर्शनाशिवाय राहू शकत नाही. भगवान गडावर जिवंत असेपर्यंत येत राहिन, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Advertisement

MahaExam IBPS Highclonoid Softec Pvt Ltd test 4