All News

'पुनश्च हरी ओम' म्हणता अन् 'हरी'लाच कोंडून ठेवता?; मनसेचा राज्य सरकारला सवाल

'पुनश्च हरी ओम' म्हणता अन् 'हरी'लाच कोंडून ठेवता?; मनसेचा राज्य सरकारला सवाल

मुंबई, दि. ०६ नोव्हेंबर : सध्या मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. विरोधी पक्ष भाजप आपली भूमिका रेटून मांडताना दिसत आहे तर राज्य सरकारच्या बाजूने महाविकास आघाडी सरकारचे नेते आपण घेतलेला निर्णय कसा योग्य आहे, हे पटवून देत आहेत. आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उडी घेत 'पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता?; असा सवाल मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी केला आहे.


केंद्र सरकारने गुटखा निर्मिती आणि विक्रीवर संपूर्ण देशात बंदी आणावी, अशी मागणी करतानाच महाराष्ट्र सारख्या राज्यात गुटखा विक्रीवर बंदी आहेच. परंतु तरीही राज्यात चोरट्या मार्गाने दुसऱ्या राज्यातून अनेक मार्गांनी गुटखा येत असून त्याला पायबंद घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. गुटखा सेवन करून काही लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकत असतात. इतरांच्या आरोग्यासाठी हे घातक असल्यानेच देशभरातही गुटखा विक्रीवर बंदी आणा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Advertisement

IBPS test2 Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam