नाशिक, ता. १३ ऑगस्ट : शिक्षण संस्था चालकांकडून मंजुरीच्या कामासाठी चालकामार्फत 8 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी झणकर यांना ACB कडून अटक करण्यात आली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांना फरार घोषित करण्यात आलं होत. शिक्षणसंस्थेकडून 8 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) ताब्यात घेतलेल्या आणि चौकशीनंतर घरी परतलेल्या वैशाली वीर-झनकर या फरार झाल्या होत्या. त्यांच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.