All News

आरेचं जंगल आता 800 एकरांचं तर मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार

आरेचं जंगल आता 800 एकरांचं तर मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार

मुंबई, दि. ११ ऑक्टोबर :  'आरे'तील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये करण्यात येईल, अशी मोठी घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. शासकीय जमिनीवर हे कारशेड होणार असून त्यासाठी शून्य खर्च येणार आहे, असे ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी ही घोषणा केली. आरे कॉलनीतील कारशेडला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली होती. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

उद्धव ठाकरे यांनी आरेमधील 800 एकर परिसर हा आता जंगल म्हणून घोषित केला आहे. 'आरेचा परिसर जंगल म्हणून घोषित केल्यानंतर मेट्रो कारशेडचं काय होणार असा प्रश्न होता. पण, आता हा मेट्रो कारशेड कांजुरमार्ग इथं उभारण्यात येणार आहे. कांजुरमार्गमधील जागा ही सरकारची आहे. त्यामुळे यासाठी कोणताही खर्च येणार नाही' असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

जीम सुरु करण्याची मागणी होत आहे, त्याबद्दल लवकर नियमावली देण्यात येईल. जीममध्ये व्यायाम करताना, हार्टच पम्पिंग रेट जास्त असतो. त्यामुळे श्वासोश्वास वाढतो आणि त्यातून करोनाचा प्रसार होऊ शकतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यातील मंदिर सुरु करण्याबाबत सध्या आम्ही हळूवारपणे पावले उचलत आहोत. अनेकजण हे सुरु झालं, मग ते का नाही, असे प्रश्न विचारत आहेत. मात्र, त्यांनी शांत बसावे. सरकार चालवण्याची जबाबदारी तुमच्यावर नव्हे तर आमच्यावर आहे. आम्हाला जनतेची काळजी आहे. उगाच तंगड्यात तंगडं घालण्याची सवय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तूर्तास लोकल ट्रेन सुरु न करण्याचे संकेत दिले आहेत. सर्वांनाच लोकल हवी आहे, पण मला गर्दी नको. त्यामुळे सध्या आपण लोकलची संख्या वाढवण्यावर भर देणार आहोत. ही संख्या वाढल्यावर त्यात आणखी लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Advertisement

test 4 IBPS Highclonoid Softec Pvt Ltd IBPS