मुंबई, दि. ९ ऑगस्ट अनेक महिन्यांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त असलेले ६३ वर्षांचे अभिनेते अनुपम श्याम ओझा यांचे निधन झाले. अल्पावधीत शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्येष्ठ अभिनेते अनुपम गेली २७ वर्षे फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करत होते. त्यांच्यासोबत काम करणारे अनेक कलाकार यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहिले. यात यशपाल शर्मा, आदित्य श्रीवास्तव, संजय मिश्रा, मुकेश तिवारी, अभय भार्गव सारख्या अनेक कलाकारांनी अनुपम श्याम यांना श्रद्धांजली वाहिली.ज्येष्ठ
अभिनेते अनुपम श्याम यांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर सुद्धा अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दिग्दर्शक अर्जुन पंडित, अभिनेता मनोज जोशी, रणवीर शौरी या कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.