All News

गणपतीच्या पाटाखाली राज्यघटना ठेवल्यानं अभिनेता प्रवीण तरडे यांनी मागितली माफी

गणपतीच्या पाटाखाली राज्यघटना ठेवल्यानं अभिनेता प्रवीण तरडे यांनी मागितली माफी

पुणे, दि. २२ ऑगस्ट : मुळशी पॅटर्न सिनेमाचे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले. पण, गणरायाच्या मूर्तीच्या पाटाखाली देशाचे संविधान ठेवल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले. अखेर प्रविण तरडे यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून स्पष्टीकरण दिले आहे.

प्रविण तरडे यांनी या व्हिडिओ आपल्या हातातून झालेली चूक मान्य केली आहे. 'मी माझ्या घरी या वर्षी पुस्तक बाप्पा अशी संकल्पना केली होती. पण, यावेळी माझ्याकडून चूक झाली. गणरायाच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधान ठेवले होते. कारण, गणराय हा बुद्धीचा आणि कलेचा दैवता आहे. त्यामुळे अशी माझी भावना होता. पण, ती खूप मोठी चूक होती' अशी कबुली तरडेंनी दिली. तरडेंनी टीका होत असलेली पाहून नंतर ती पुस्तक बाप्पाच्या फोटोची पोस्टच डिलीट केली आहे. मात्र, तोपर्यंत या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. तरडेंची कल्पना नेटकऱ्यांना काही आवडली नाही. हा फोटो पाहिल्यानंतर तरडेंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam test2