All News

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई, दि. १ डिसेंबर : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत मातोश्रीवर जाहीर प्रवेश केला. उर्मिला यांच्या हातावर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. यावेळी उर्मिलांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामाचे कौतुकसुद्धा केले. त्याचबरोबर शिवसेनेची महिला आघाडी भक्‍कम असल्याचे म्हटले. महिला सुरक्षेसारखा विषयांवर काम करायला आवडेल, असे उर्मिला यांनी म्हटले. यावेळी उर्मिला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतिसुमनेही उधळली. करोना काळात चांगले काम करत असल्याचे प्रशस्तीपत्रकही त्यांनी दिले. तसेच ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे मुख्यमंत्री असल्याचे मत उर्मिला यांनी मांडले.


राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज उर्मिला यांनी शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभरात सरकारने चांगले काम केले आहे. उद्धव ठाकरे हे जनतेला मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्राला लाभले आहे. त्यांचे काम सर्वांनी पाहिले आहे. त्यांनी महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करायला आपल्याला आवडेल, मी एक शिवसैनिक म्हणून आले आहे आणि शिवसैनिक म्हणूनच काम करणार आहे, असं म्हणतं मातोंडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं.


Advertisement

MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd IBPS IBPS