All News

मालेगाव तालुक्यात कृषी विज्ञान संकुल उभारणार

मालेगाव तालुक्यात कृषी विज्ञान संकुल उभारणार

नाशिक, दि.२६ ऑगस्ट : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मौजे काष्टी येथे कृषी विज्ञान संकुलातील  देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या संकुलात शासकीय कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यात येईल.

2020-21 या शैक्षणिक वर्षापासून कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु करण्यास तसेच यासाठी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर अशा 76 पदांना देखील मान्यता देण्यात आली.  अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय अभ्यासक्रम देखील सुरु करण्यात येईल.  या सर्वांसाठी 70 कोटी रुपये खर्च येईल.

Advertisement

MahaExam IBPS test 4 test2