All News

आधुनिक लॅब आणि विक्रमगड येथील समर्पित कोविड रुग्णालयाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-शुभारंभ

आधुनिक लॅब आणि विक्रमगड येथील समर्पित कोविड रुग्णालयाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-शुभारंभ

पालघर, दि. १७ ऑगस्ट  : 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्र MRHRU डहाणू येथे कार्यरत जिल्ह्यातील प्रथम शासकीय COVID-19 निदान प्रयोगशाळेतील स्वयंचलित एक्सट्रॅक्शन मशीन रिवेरा समर्पित कोविड रुग्णालय हातणे विक्रमगड येथील व्हेंटिलेटरसह अतिदक्षता विभाग याचा शुभारंभ कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री पालघर दादाजी भुसे यांच्या हस्ते पार पडला. COVID-19 च्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष उद्घाटन न करता नियोजन भवन, सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आयोजित समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास  वणगा, पालघर जि. प. अध्यक्षा भारती कामडी, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेच्या संचालक स्मिता महाले, शल्यचिकित्सक कांचन वानेरे उपस्थित होते. आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्र डहाणूचे नोडल अधिकारी डॉ. संजय चव्हाण, प्रयोगशाळेचे कृष्णा चैतन्ये, उपस्थित होते. आरोग्य विभागात कार्यरत जिल्हा सल्लागार डॉ. अमर खिराडे यांनी सूत्रसंचालन व पॉवरपॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून शुभारंभ कार्यक्रमाची समन्वयाची जबाबदारी पार पाडली.

सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी COVID-19 निदान प्रयोगशाळेचे आत्तापर्यंतचे कार्य व डीसीमार्फत रुग्णांना प्रदान करण्यात आलेल्या सेवांवर आकडेवारीसह प्रकाश टाकला. कार्यान्वित करण्यात आलेल्या 50 बेड क्षमतेच्या अतिदक्षता विभागाविषयी विस्तृत माहिती देताना रिवेरा रुग्णालयाचे डॉ. प्रशांत राजगुरू यांनी हाय फ्लो ऑक्सिजन व्यवस्थेसह कार्यरत 40 व्हेंटिलेटरची उपलब्धता, केंद्रीय ऑक्सिजन, आणि सेक्शन लाईन, पोर्टेबल एक्सरे मशीन व रुग्ण देखभालीकरता चोवीस तास कार्यरत कर्मचारी वर्ग यांच्या उपलब्धतेसह अतिदक्षता विभागाची सुसज्जता स्पष्ट केली.

जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या COVID-19 निदान प्रयोगशाळेतील स्वयंचलित RNA एक्सट्रॅक्शन मशिनमुळे COVID-19 नमुने तपासणीचा वेग वाढणार असून प्रयोगशाळेच्या क्षमता दुपटीने वाढ होणार आहे त्यामुळे COVID-19 बाधित रुग्णांची लवकर निदान करता येणे शक्य होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test2 test 4 Highclonoid Softec Pvt Ltd