All News

टीम इंडियाने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

टीम इंडियाने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

सिडनी, दि. ८ डिसेंबर : कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतरही भारतीय संघाला मंगळवारी यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात १२ धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह यजमान संघाने सामना जिंकला तर, भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली. हार्दिक पांडया मालिकावीर तर मिचेल स्वेपसन सामन्याचा मानकरी ठरला.


विराट कोहली म्हणाला, 'एका क्षणाला ज्यावेळी हार्दिकने फटकेबाजीला सुरुवात केली त्यावेळी आम्हाला वाटलं की आम्ही सांना जिंकू. पण मधल्या षटकांमध्ये ज्या पद्धतीने विकेट पडल्या त्याचा आम्हाला फटका बसला. हार्दिकसोबत आणखी ३० धावांची भागीदारी झाली असती तर सामन्याचं चित्र वेगळं दिसू शकलं असतं, असेही विराटने सांगितले. तिसऱ्या मॅचमध्ये भारताचा १२ रनने पराभव झाला असला तरी भारताने आधीच ही सीरिज खिशात टाकली होती. हार्दिक पांड्या याला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं, पण त्याने मोठे मन दाखवलं आणि आपला मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार नटराजनला दिला.



कोहलीने ८५ धावांची खेळी करत चांगली लढत दिली, पण त्याचे प्रयत्नही तोकडे पडले. विराट कोहली आणि हार्दिक मैदानावर असताना एका क्षणाला भारत सामन्यात बाजी मारेल असं वाटत होतं, परंतू ऑस्ट्रेलियाने अखेरपर्यंत सामन्याचं भारतावर अंकुश लावत सामन्यात बाजी मारली. दरम्यान, टी-२० मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघासमोर ४ कसोटी सामन्यांचं आव्हान असणार आहे. १७ डिसेंबरपासून अॅडलेडच्या मैदानावर पहिला कसोटी सामना रंगणार आहे. 

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test2 IBPS IBPS