All News

भाजपा नेते गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

भाजपा नेते गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई, दि. १४ ऑक्टोबर : राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. जामनेर येथे काल (१३ ऑक्टोबर) एका कार्यक्रमादरम्यान महाजन यांच्या स्वीय सहाय्यकाला धमकीचा फोन आला होता. 

गिरीश महाजन यांच्या जी. एम. फाउंडेशनतर्फे ग्लोबल हॉस्पिटलचे मंगळवारी जामनेर येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात महाजन याचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांना एक फोन आला. यामध्ये गिरीश महाजन यांना एक कोटी रुपये देण्यास सांग अन्यथा बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली. जामनेर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test2 Highclonoid Softec Pvt Ltd