All News

कोरोना संपल्यावर नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होणार

कोरोना संपल्यावर नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होणार

नवी दिल्ली, दि. २० ऑक्टोबर : देशातील कोरोनाची साथ आटोक्यात येऊन परिस्थिती थोडीशी सुधारल्यानंतर केंद्र सरकारकडून लगेचच नागरिकत्व सुधारणा कायद्याची (CAA) अंमलबजावणी केली जाईल, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले.

 

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या 'फोडा आणि राज्य करा', या धोरणाचा अवलंब करत आहेत. तसेच ममता यांच्या हट्टामुळे पश्चिम बंगालमधील नागरिक मोदी सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांपासूनही वंचित राहिल्याचा आरोप नड्डा यांनी केला आहे. सरकारकडून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या नियमांची आखणी केली जाईल. यानंतर लवकरच नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होईल आणि तुम्हा सर्वांना त्याचा लाभ मिळेल. आम्ही नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध आहोत, असे जे.पी. नड्डा यांनी स्पष्ट केले.


Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd test2