All News

नदीकिना-यांवर कोरोनाबाधितांचे मृतदेह...आणि दडवलेली आकडेवारी

नदीकिना-यांवर कोरोनाबाधितांचे मृतदेह...आणि दडवलेली आकडेवारी

नवी दिल्ली, दि. १४  मे :  उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश आदी राज्यांत कोरोनाबाधितांचे मृतदेह आढळत असल्याने या राज्यांतील जनता भयचकित झाली आहे. त्यातच गुजरातमधील महत्त्वाच्या आठ शहरांत कोरोनामुळे सुमारे सव्वाचार हजार मृत्यू झाल्याचे प्रशासन सांगत असताना या शहरांतून सव्वा लाख लोकांचे मृत्यूचे प्रमाणपत्र दिल्याने साशंकता निर्माण झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या लोकसंख्येच्या निकषांवर स्मशानभूमी विकसीत केलेल्या असतात. दररोज सरासरी किती मृत्यू होतात, हे लक्षात घेऊन स्मशान ओटे आणि विद्युत दाहिन्या तयार केलेल्या असतात; परंतु त्याच्या कितीतरी पटीने अधिक मृत्यू कोरोनामुळे होत आहेत. त्यातच अंत्यसंस्कारासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागते. मृतदेह ताब्यात घ्यायला नातेवाइक नकार देतात. अशा परिस्थितीत ब-याचदा नातेवाइक अंत्यसंस्कार न करताच मृतदेह तसेच फेकून द्यायला लागले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश  आदी राज्यांत असे प्रकार वाढले आहेत. बिजनौर, मेरठ, मुझफ्फरनगर, बुलंदशहर, हापूर, अलिगड, कासगंज, संभल, अमरोहा, बदनयू, शाहजहांपूर, हरदोई, फर्रुखाबाद, कन्नौज, कानपूर, उन्नाव, रायबरेली, फतेहपूर, प्रयागराज, प्रतापगड, भदोही, मिरजापूर व भोजित बलियाच्या जवळून गंगा उत्तर प्रदेशातील 1140 किलोमीटरचा प्रवास करून बिहारमध्ये प्रवेश करते. त्यापैकी कानपूर, कन्नौज, उन्नाव, गाझीपूर आणि बलिया येथे परिस्थिती अतिशय वाईट आहे. सर्वांत वाईट परिस्थिती कन्नौजमध्ये सुमारे 350 हून अधिक मृतदेह पुरण्यात आले आहेत. प्रशासन फक्त मृतदेहावर माती टाकून मोकळे होत आहे. पाण्याची पातळी वाढताच गंगेच्या काठी दफन झालेले मृतदेह वाहून जातात. गंगेच्या काठी वसलेल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. कानपूरच्या शेरेश्वर घाटात अर्ध्या किलोमीटर अंतरावर 400 हून अधिक मृतदेह पुरण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांत मृतदेहांची विटंबना होताना दिसली. काही मृतदेहांचे लचके कुत्री तोडतानाचे दृष्य दिसले. काही मृतदेहांवर गरुड व कावळे बसलेले दिसले. पोलिसांनी काही मृतदेहावर माती टाकली.  उन्नावच्या के शुक्लागंज घाट आणि बक्सर घाटाजवळ 900 हून अधिक मृतदेह पुरण्यात आले आहेत. उन्नावला लागून असलेल्या फतेहपूरमध्ये सुमारे 20 मृतदेह गंगेच्या बाजूला पुरलेल्या अवस्थेत आढळले. प्रयागराज, वाराणसी, चांदौली, भदोही, मिर्जापूर येथे 50 मृतदेह सापडले वाराणसीच्या सुजाबाद घाटाजवळील गंगेतील मृतदेह जेसीबीच्या मदतीने पुरण्यात आले. संगमनगर प्रयागराज येथून आतापर्यंत 13 मृतदेह गंगा व यमुना नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. चांदौलीच्या बरोरा गावात गंगा घाटात दोन दिवसांत 12 हून अधिक मृतदेह दिसले. पोलिसांनी या सर्व मृतदेहांचे दफन केले. भदोही येथील रामपूर गंगा घाटात मागील दोन दिवसात गंगाच्या काठावर आठ  मृतदेह सापडले. गाझीपूर सीमेवर अनेक मृतदेह एकाच वेळी दिसले. दोन दिवसांपूर्वी बिहारच्या बक्सरमध्ये 100 हून अधिक मृतदेह सापडले. गाझीपूरला लागून असलेल्या बलियामधील गंगेमध्ये आतापर्यंत 15 मृतदेह सापडले आहेत.

गुजरातमध्ये एक लाख 23 हजार 871 मृत्यू प्रमाणपत्रे अवघ्या 71 दिवसांत जारी करण्यात आली आहेत. सरकारी आकडेवारीनुसार कोरोना येथे मृतांचा आकडा फक्त चार हजार 218 वर आला आहे. अशा परिस्थितीत प्रश्न असा आहे की केवळ 71 दिवसांत सुमारे 1.25 दशलक्ष लोक कसे मरण पावले?

मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णाच्या मृत्युमुळे स्मशानभूमीत जागा उरली नाही. मृत्यू प्रमाणपत्रांनुसार यंदा मार्च महिन्यात राज्यात 26 हजार 26 मृत्यू, एप्रिलमध्ये 57 हजार 796 आणि मेच्या पहिल्या 10 दिवसांत 40 हजार 51 मृत्यू झाले. आता या आकडेवारीची तुलना २०२० च्या तुलनेत केल्यास मार्च २०२० मध्ये २3 हजार 5३२ मृत्यू, एप्रिल २०२० मध्ये २१ हजार 591  आणि मे २०२० मध्ये १३ हजार १२5 मृत्यूची नोंद झाली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षांच्या 71 दिवसांत मरण पावलेल्या लोकांची संख्या दुपटीने वाढली आहे.

Advertisement

IBPS IBPS Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd