All News

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांवर - आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांवर - आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.२४ सप्टेंबर : राज्यात बुधवारी  १९ हजार ४७६ रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून आज २१ हजार २९ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९ लाख ५६ हजार ३० वर पोहोचली असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.६५ टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात सध्या २ लाख ७३ हजार ४७७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.


बुधवारी निदान झालेले २१,०२९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४७९ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२३६० (४९), ठाणे- ३५९ (६), ठाणे मनपा-४३२ (१४), नवी  मुंबई मनपा-४८० (११), कल्याण डोंबिवली मनपा-४६९ (४), उल्हासनगर मनपा-७१ (१), भिवंडी निजामपूर मनपा-५६, मीरा भाईंदर मनपा-२४५ (३), पालघर-१९२ (३), वसई-विरार मनपा-२५० (४), रायगड-४६३ (३०), पनवेल मनपा-२८६, नाशिक-५२४ (५), नाशिक मनपा-१२४३ (८), मालेगाव मनपा-६३, अहमदनगर-५९८ (११),अहमदनगर मनपा-२४८ (५), धुळे-६९ (१), धुळे मनपा-६०, जळगाव-३६४ (५), जळगाव मनपा-१५८, नंदूरबार-५९, पुणे- १२६४ (२२), पुणे मनपा-१७९७ (२६), पिंपरी चिंचवड मनपा-७८६ (१३), सोलापूर-४५५ (१४), सोलापूर मनपा-५६, सातारा-६०४ (२८), कोल्हापूर-३७५ (५१), कोल्हापूर मनपा-९७ (१२), सांगली-५०८ (३२), सांगली  मिरज कुपवाड मनपा-१८२ (४), सिंधुदूर्ग-१०४, रत्नागिरी-७८ (२), औरंगाबाद-११७ (१),औरंगाबाद मनपा-१८९ (१), जालना-१०९ (१), हिंगोली-५५, परभणी-५३ (४), परभणी मनपा-१५ (९), लातूर-२४२ (१), लातूर मनपा-११९ (१), उस्मानाबाद-२८६ (७), बीड-२०२ (२), नांदेड-१४१ (५), नांदेड मनपा-८० (३), अकोला-४२, अकोला मनपा-२३, अमरावती-११२ (४), अमरावती मनपा-३१० (३), यवतमाळ-३३६, बुलढाणा-१२९, वाशिम-१२८, नागपूर-५११ (११), नागपूर मनपा-१३७३ (४७), वर्धा-१३५ (७), भंडारा-१२२ (२), गोंदिया-३५० (४), चंद्रपूर-१९०, चंद्रपूर मनपा-१७१ (१), गडचिरोली-९८ (१), इतर राज्य- ३६.


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६१ लाख ६ हजार ७८७ नमुन्यांपैकी १२ लाख ६३ हजार ७९९ नमुने पॉझिटिव्ह ( २०.६९ टक्के) आले आहेत. राज्यात  १८ लाख  ७५ हजार ४२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ४५७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४७९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६८ टक्के एवढा आहे.

Advertisement

test 4 IBPS Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd