All News

भारतात एकूण लसीकरनाणे गाठला 43 कोटीचा टप्पा

भारतात एकूण लसीकरनाणे गाठला 43 कोटीचा टप्पा

नवी दिल्ली, दि. २५  जुलै : भारताच्या एकूण लसीकरणाने  43 कोटीचा (43,26,05,567) मैलाचा टप्पा गाठला आहे. शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या  अहवालानुसार कोविड -19 लसीकरणाच्या सार्वत्रिकरणाचा नवीन टप्पा २१ जूनपासून सुरू झाला. संध्याकाळी  7 वाजता प्राप्त तात्पुरत्या  अहवालानुसार आज सुमारे  46 लाख (, 45,74,298) लसींच्या मात्रा देण्यात आल्या  आहेत.

आज 18--44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना .22,80,435 मात्रा लसीच्या पहिल्या मात्राच्या  रूपात आणि 2,72,190 मात्रा दुसऱ्या मात्रा स्वरूपात देण्यात आल्या . लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरु झाल्यापासून  एकूणच, 37 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील 18-44 वयोगटातील 13,77,91,932  व्यक्तींना पहिली मात्रा मिळाली आहे आणि  एकूण 60,46,308 लोकांना दुसरी मात्रा मिळाली आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांत 18--44 वर्षे वयोगटातील लोकांना एक कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. तसेच आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, झारखंड, केरळ, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी 18-44  वयोगटातील व्यक्तींना 10 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.

Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd test 4 MahaExam