All News

दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण

दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण

दुबई, दि. २९ सप्टेंबर : दिल्ली आणि हैदराबाद या संघांमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी अखेर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याला संधी देण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करत आहे.

अव्वल स्थानावरील दिल्लीचा संघ विजयी हॅट्रिकसाठी मिळवण्यासाठी सज्ज झालेला असेल. दिल्लीने आपल्या संघात महत्त्वाचा बदल करत अनुभवी इशांत शर्माला संघात स्थान दिले. तर आवेश खानला बाहेरचा रस्ता दाखवला. हैदराबादनेदेखील संघात दोन बदल करत विल्यमसनला मोहम्मद नबीच्या जागी संघात स्थान दिले. तर वृद्धिमान साहाच्या जागी अब्दुल समादला संघात जागा दिली आहे.


Advertisement

IBPS IBPS Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd