दिल्ली, दि. ९ मे : एक आठवड्याच्या लॉकडाऊननंतरही पॉझिटिव्हिटी दर सर्वाधिक राहिल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक आठवड्याचा कडक लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊन वाढवला असून 17 मे रोजी सकाळी पाच वाजता संपेल. दिल्लीतील मेट्रोसेवेही बंद ठेवण्यात आली आहे.
केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांची ओळखपत्रे दाखवून प्रवास करता येईल. अन्य व्यक्तींना मात्र इ पास साठी अर्ज करावा लागेल. मात्र या टप्प्यात कुरीयर सर्व्हिसेस, वायरमन, प्लंबर किंवा वॉटर फ्युरीफायर दुरूस्ती करणारे, शैक्षणिक पुस्तकाची दुकाने आणि इलेक्ट्रिकल पंखे दुरूस्त करणारी दुकाने खोलण्यास परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी काम करणाऱ्यांनी प्रवासासाठी इ पाससाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिल्लीत गेल्या १९ एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीन वेळा हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. उद्या १० मे रोजी हा लॉकडाऊन संपणार होता.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.