All News

ठाकरे सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धंदा

ठाकरे सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धंदा

भंडारा , दि. ०२ सप्टेंबर : नागपुरात करोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. आता हळूहळू मृत्यूदेखील वाढत असून, ही स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे नागपुरला आयसोलेशन धोरण आखण्याची गरज आहे. जास्तीत जास्त चाचण्या करुन आयसोलेशन करण्याची गरज आहे. त्यामुळे मृ्त्यू संख्येवर नियंत्रण आणता येईल. गेल्या दौऱ्यात मी अधिकाऱ्यांसी यासंबंधी चर्चा केली होती. आता हे धोरण आक्रमकपणे राबवण्याची गरज आहे," असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

शासन फक्त बदल्यांच्या मागे लागले आहे. बदल्या करणे हा एकमेव धंदा शासनात चालला आहे. बदल्या महत्त्वाच्या आहेत पण एखाद्या वर्षी नाही केल्या म्हणून काही फरक पडत नाही. बदल्यांचा एका वर्षाचा खर्च ५०० कोटींच्या घरात जातो. करोना संकट असताना या बदल्या केल्या नसत्या तरी चालले असते. पण मंत्री, प्रशासन सगळेजण कोणाला कशी पोस्टिंग मिळणार, कुठे बदली होणार यात गुंग आहेत," अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

"बदल्या दरवर्षी होत असतात पण आमच्या काळात करोना नव्हता. जर आमच्या काळात करोना असता आणि बदल्या झाल्या असत्या तर बोट दाखवता आले असते. बदल्यांचा भत्ता देण्यासाठी ५०० कोटी लागतात. येथे पगार देण्यासाठी पैसे नाही आणि मग बदल्या कशाला सुरु आहेत?," अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Advertisement

IBPS IBPS test 4 Highclonoid Softec Pvt Ltd