All News

दिलीप गोटखिंडीकर यांचे निधन

दिलीप गोटखिंडीकर यांचे निधन

नाशिक, दि. २९ डिसेंबर : पेठे हायस्कूल मधील माजी  शिक्षक आणि संघस्वयंसेवक दिलीप गोटखिंडीकर यांचे सकाळी वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. गोटखिंडीकर गणिताचे शिक्षक होते.

मराठी माध्यमातून गणित लेखन करण्याचा त्यांना आनंद होता. गणित अभ्यासाची व शिकवण्याची आवड होती त्यामुळे निवृत्तीनंतरही त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. एकल अभियानाशी त्यांचा संबंध होता. गणिताच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतला. त्यांना अनेक पारितोषिके मिळाली होती आणि त्यांचे अनेक सन्मान झाले होते. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कामातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. वैदिक गणितामधील ते एक तज्ञ समजले जात. नाशिक मधील गणिततज्ञ कैलासवासी दत्तात्रय कापरेकर यांच्यानंतर नाशिकचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे नाशिक मधील एक ख्यातनाम गणिततज्ञ होते.

Advertisement

MahaExam test 4 Highclonoid Softec Pvt Ltd test2