All News

पूजा चव्हाण मृत्युप्रकरणी घाणेरडे राजकारण

पूजा चव्हाण मृत्युप्रकरणी घाणेरडे राजकारण

  • वनमंत्र्यांची टीका; सामाजिक, व राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

वाशिम, दि. २३ फेब्रुवारी :  ’पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणाचे घाणेरडे राजकारण केले जात असून ते चुकीचे आहे. माझी सामाजिक आणि राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे,’ टीका वनमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. 


जवळपास दोन आठवड्यांनी लोकांसमोर आल्यानंतर राठोड यांनी पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे. सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात नाव आल्यामुळे वादात सापडलेल्या राठोड यांनी पूजाच्या आत्महत्येवर पहिल्यादांच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाज दुःखी आहे. चव्हाण कुटुंबीयांच्या दुखाःत मी सहभागी आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरू केली आहे. तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. 


’समाजमाध्यम आणि प्रसार माध्यमातून जे दाखण्यात आले, त्यात तथ्य नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो. या प्रकरणावरुन गेल्या 10 दिवसांपासून माझी बदनामी करण्यात येत आहे. मी सर्वांना विनंती करतो आहे. पोलिस चौकशी करीत आहेत तोपर्यंत माझ्या समाजाची, माझी बदनामी करू नका,’ अशी कळकळीची विनंती राठोड यांनी केली आहे. ’मी 15 दिवस गायब नव्हतो. मुंबईतील फ्लॅटवरुन शासकीय काम करत होतो. आजपासून पुन्हा पूर्वीप्रमाणे काम करणार आहे. चौकशीमधून सर्व सत्य बाहेर येईल, आपण विश्वास ठेवावा,’ असे ते म्हणाले.


आरोपीच्या पिंज-यात उभे करू नका

’सोशल मीडियावर संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे फोटो व्हायरल झाल्याबद्दलही राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेली 30 वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात काम केले आहे. अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंज-यात उभे करू नका,’ असे आवाहनही राठोड यांनी केले आहे.


राठोडच्या मुसक्या आवळा

याबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, की या सगळ्या बलात्कार्‍यांना पाठिशी घालण्यासाठी मंत्र्यांची चढाओढ सुरू आहे. तू जास्त बोलतो, की मी जास्त बोलतो. हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी अजिबातच साजेसे नाही. त्यामुळे सरकारने महिला सुरक्षेचे, महिला सक्षमीकरणाचे नारे बाजूला ठेवून अ‍ॅक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे. पूजा चव्हाणचा मारेकरी संजय राठोड यांच्या मुसक्या ताबडतोब आवळल्या पाहिजे, ही आमची मागणी आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test2