All News

पुण्यात डाॅक्टर्स डे च्या दिवशीच डाॅक्टर दांपत्याची आत्महत्या

पुण्यात डाॅक्टर्स डे च्या दिवशीच डाॅक्टर दांपत्याची आत्महत्या

पुणे, दि.  १ जुलै : डॉक्टर डे दिवशीच मनाला चटका लावणारी घटना पुण्यात घडली. नवविवाहित डॉक्टर दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नवरा-बायकोत झालेल्या किरकोळ वादानंतर दोघांनी धक्कादायक पाऊल उचलले. दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याचा वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी हा प्रकार घडला. एकीकडे डॉक्टर दिवस असल्यामुळे डॉक्टरांप्रती सन्मान व्यक्त केला जात असतानाच अशाप्रकारे दुःखद घटना झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. निखील शेंडकर (वय 27) आणि अंकिता निखील शेंडकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर पती पत्नीची नावे आहेत.

Advertisement

test2 MahaExam test 4 Highclonoid Softec Pvt Ltd