All News

IMA चे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन

IMA चे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन

  • लसीचे घेतले होते दोन्ही डोस

नवी दिल्ली, दि. १८ मे :  इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे काल रात्री 11.30 च्या सुमारास कोरोना संसर्गामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले होते. तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी डॉ. केके अग्रवाल यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

गेल्या महिन्यात त्यांना संसर्ग झाला होता. अग्रवाल यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल केले होते. केके अग्रवाल यांनी 28 एप्रिल रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवर माहिती दिली होती की त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.



Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test 4 IBPS MahaExam