All News

Nashik Oxygen Tank Leak : राज्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळणे गरजेचे : फडणवीस

Nashik Oxygen Tank Leak : राज्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळणे गरजेचे : फडणवीस

मुंबई, दि. २१ एप्रिल : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीला दुपारी १२ च्या सुमारास गळती सुरु झाली. या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत तब्बल २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. या घटनेनंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळणे गरजेचे असून या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. 


रुग्णालयात जे पेशंट आहेत त्यांना योग्य उपचार मिळणं गरजेचे आहे. तसेत कोणत्या रुग्णांना शिफ्ट करायचे असल्यास त्यांना लवकर केले पाहिजे. तसेच अशी घटना पुन्हा घडणार नाही याचीही काळजी घेतली जाईल. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहोत असे त्यांनी सांगितले आहे. 

Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test 4