All News

Bihar Election : निवडणूक आयोगाने ३५ कोटी रुपये केले जप्त

Bihar Election :  निवडणूक आयोगाने ३५ कोटी रुपये केले जप्त

पाटणा, दि. २० ऑक्टोबर : निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली आहे. या निवडणुकीत पैशाचा अवैध वापर केला जावू नये, अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी उमेदवारांच्या खर्चाच्या देखरेखीची प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडली जात आहे. निवडणूक आयोगाने राज्यात खर्चाच्या देखरेखीसाठी 67 निरीक्षक तैनात केले आहेत. त्याचबरोबर आयोगाने मधू महाजन (माजी आयआरएस-आय.टी.- 1982 ) आणि बी.आर. बालकृष्णन (माजी आयआरएस-आय.टी.- 1983 ) यांचीही खर्चविषयक विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. निवडणूक काळामध्ये कशा पद्धतीने पैशाचा अवैध विनियोग केला जातो आणि असे प्रकार घडू नयेत म्हणून काय करावे लागते, या विषयामध्ये हे दोन्ही विशेष अधिकारी कुशल म्हणून परिचित आहेत.


राज्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांचे मूल्यांकन केल्यानंतर या दोन्ही विशेष अधिका-यांनी 91 विधानसभा मतदारसंघांना अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी चिह्नित केले आहे. हे मतदारसंघ खर्चाच्याबाबतीत संवेदनशील असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. निवडणूक खर्चाच्या देखरेखीसाठी  881 भरारी पथके आणि 948 पाळत ठेवणारी स्थिर पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच निवडणूक आयोगाने बिहार आणि शेजारच्या राज्यातल्या वरिष्ठ अधिका-यांबरोबरही बैठका आयोजित केल्या आहेत.


निवडणूक प्रक्रियेच्या काळामध्ये रोख रक्कम देणे, भेटवस्तूंचे वितरण करणे यांना कायद्याने परवानगी नाही. उदाहरणार्थ, मतदारांना खुश करण्यासाठी तसेच त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी  पैसे, मद्य अथवा इतर कोणत्याही वस्तू देण्यास मनाई आहे. असा प्रयत्न निवडणुकीतल्या कोणाही उमेदवाराने केला तर ती ‘लाच’ दिली गेली असे समजून त्या उमेदवारावर भारतीय दंड विधान 171 बी आणि आर.पी. कायदा 1951 अनुसार कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. बिहारमध्ये दि. 19 ऑक्टोबर, 2020 पर्यंत 35.26 कोटी रूपये जप्त करण्यात आले आहेत. याआधीच्या म्हणजे सन 2015च्या विधानसभा निवडणुकीत 23.81 कोटी रुपये जप्त केले होते.

Advertisement

test 4 Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam IBPS