All News

कोरोनाच्या काळातही गृहखरेदी जोरात

कोरोनाच्या काळातही गृहखरेदी जोरात

मुंबई, दि. २१ मे :  कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अन्य सर्व क्षेत्रावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असताना गृहखरेदीवर मात्र कोरोनाचा कोणताही परिणाम झालेला नाही. उलट, गृहकर्ज आणि गृहखरेदीत वाढ झाली आहे. युवकांकडून गृहखरेदीचे प्रमाण वाढले आहे.

वित्त वर्ष 2020-21 मध्ये युवकांचा घर खरेदीकडे अधिक ओढा होता. देशातील कोरोना प्रकरणात घट झाली, तेव्हा त्याचा फायदा गृहनिर्माण क्षेत्राला फायदा झाला. ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 या काळात देशातील लोकांनी जोरदार घर खरेदी केली. डिसेंबरच्या तिमाहीत देशातील गृहनिर्माण कर्जाच्या बाजारात वार्षिक आधारावर 9.6 टक्के वाढ झाली आहे. क्रेडिट इन्फोर्मेशन ब्यूरो सीआरआयएफ हाय मार्कच्या ताज्या अहवालानुसार डिसेंबरच्या तिमाहीत एकूण पोर्टफोलिओ 22 लाख 26 हजार कोटी रुपये होते, त्या तुलनेत डिसेंबर 2019 मध्ये पोर्टफोलिओ थकबाकी 20 लाख 31 हजार कोटी रुपये होती. डिसेंबर 2019 मध्ये 10.4 टक्क्यांची वाढ झाली होती. कोरोनामुळे मार्च 2020, जून 2020 आणि सप्टेंबर 2020 मध्ये फार वाढ नसली, तरी घटही नव्हती. मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे देशव्यापी टाळेबंदी लादली गेली. यामुळे देशभरातील बहुतेक व्यवसाय आणि कर्ज देण्याचे काम बंद झाले होते. डिसेंबर 2020 च्या तिमाहीत गृहनिर्माण कर्जाच्या मागणीत वसुली झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.

डिसेंबर 2020 मध्ये परवडणार्‍या घरांच्या कर्जात वाढ झाली. (35 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज) त्याचे एकूण गृहकर्जाशी प्रमाण 90 टक्के होती. दुसरीकडे, किमतीचा विचार करता परवडणार्‍या घरांचा एकूण हिस्सा 60 टक्के आहे. परवडणार्‍या घरांचा विचार केला, तर 15 लाख रुपयांपर्यंतच्या घरांच्या विक्रीचे एकूण प्रमाण 70 टक्के आणि मूल्याचा विचार केला, एकूण विक्रीत 38 टक्के इतके आहे. अहवालानुसार, 2020-21 आर्थिक वर्षात, 36 वर्षांखालील व्यक्तींचा घर खरेदीत मोठा वाटा आहे. गृहनिर्माण कर्जात मूल्य आणि व्हॉल्यूमच्या बाबतीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा बाजारात जास्त वाटा आहे. गेल्या तीन वर्षांपासून गृहनिर्माण कर्जात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा वाटा सुमारे 45 टक्के आहे. डिसेंबर 2020 पर्यंत पाच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या गृह कर्ज उद्योगात तीस टक्के हिस्सा आहे. पहिल्या पाच खासगी बँकांचा 15 टक्के हिस्सा आहे. हाउसिंग फायनान्स कंपनीचा 37 टक्के हिस्सा आहे गृहउद्योग वित्त कंपन्यांकडे (एचएफसी) कर्ज उद्योगातील मूल्याच्या बाबतीत एकूण बाजारातील वाटा सुमारे 37 टक्के आहे. डिसेंबर 2020 पर्यंत देशातील एकूण 140 एचएफसींपैकी अव्वल पाच एचएफसींचा सहभाग होता. अहवालात असे नमूद केले आहे, की सर्व वयोगटातील कर्जदारांमध्ये डीफॉल्टमध्ये तीव्र वाढ झाली आहे. सर्वात कमी डीफॉल्ट दर 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटाचा आहे. यानंतर 26 ते 45 वर्षे वयोगटातील लोक आहेत. सर्वाधिक डीफॉल्ट दर 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कर्जदारांसाठी आहे.

Advertisement

IBPS IBPS test 4 MahaExam