All News

संमेलनात नाशिक जिल्ह्यातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन

संमेलनात नाशिक जिल्ह्यातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन

नाशिक, दि. ९ फेब्रुवारी : ९४वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन मार्चअखेरीस होत असून या संमेलनात नाशिक जिल्ह्यतील सर्व लेखकांच्या पुस्तकांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याची वाड्मयीन परंपरा वाचकांसमोर आणण्याचा प्रयन्त आयोजकांनी सुरू केला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील लेखकांनी आपापल्या पुस्तकांच्या दोन प्रति १५ मार्च २०२१ पूर्वी कुसुमाग्रजनगरी, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर डॉ. एम. एस. गोसावी औषधीनिर्माणशास्त्र महाविद्यालय व संशोधन केंद्र, कॉलेजरोड, नाशिक येथे पाठवावीत, असे आवाहन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगनराव भुजबळ, कार्याध्यक्ष हेमंत टकले, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, कार्यक्रम समन्वयक समीर भुजबळ, समिती समन्वयक विश्वास ठाकूर, सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, कार्यवाह प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, भगवान हिरे, संजय करंजकर, किरण समेळ यांनी केले आहे.

Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd test 4 test2