मुंबई, दि. १९ एप्रिल : कोविड-19 विरुद्धच्या लढ्यामध्ये आपले योगदान म्हणून रेल्वे विभागाने ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या परिचालनाच्या प्रयत्नांना वेग दिला आहे.
रेल्वेच्या मुंबई विभागीय पथकाने सपाट वाघिणींमधून प्राणवायूच्या टँकर्सची चढउतार सोपी व्हावी म्हणून कळंबोली मालवाहतूक यार्डात अहोरात्र काम करून 24 तासांच्या आत चढण बांधली आहे. रो-रो सेवेच्या माध्यमातून कळंबोली मालवाहतूक यार्डातून आज रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी 7 रिकामे टँकर विशाखापट्टणम पोलाद कारखान्याच्या यार्डात जाण्यासाठी रवाना झाले आहेत. ही गाडी वसई रोड, जळगाव, नागपूर, रायपुर जं. मार्गे विशाखापट्टणमच्या पोलाद कारखान्याच्या ECoR अर्थात पूर्व तटीय रेल्वे विभागात पोहोचेल. या ठिकाणी रिकाम्या टँकर्समध्ये वैद्यकीय वापरासाठीचा द्रवरूप प्राणवायू भरला जाईल. गेल्या वर्षीच्या टाळेबंदीच्या काळातदेखील रेल्वे विभागाने अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक सुरु ठेवून पुरवठा साखळी अबाधित राखली आणि आपत्तीकाळात देखील देशसेवेचे कार्य सुरुच ठेवले.
Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.