All News

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं निधन

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं निधन

गुवाहटी, दि. २३ नोव्हेंबर : आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. सोमवारी त्यांनी गुवाहाटी येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गोगोई यांची प्रकृती अतिशय खालवली होती.


आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई आसामध्ये ते 2001 ते 2016 पर्यंत सत्तेत होते. सलग तीन टर्म सत्तेत असणाऱ्या गोगोई यांची राजकीय कारकीर्द पन्नास वर्षांपेक्षा जास्त होती. तरुण गोगोई यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले आहे. 

Advertisement

MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd test 4 test2