All News

Coronavirus : रविंदर पाल सिंह आणि एमके कौशिक यांचं निधन

Coronavirus : रविंदर पाल सिंह आणि एमके कौशिक यांचं निधन

नवी दिल्ली, दि. ८ मे : कोरोनाची दुसरी लाट भारतात प्रचंड थैमान घालत असताना क्रीडाक्षेत्रातून एक वाईट बातमी समोर आली आहे. हॉकीपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना आपल्यापासून हिरावलं आहे. रविंदर पाल सिंह आणि एमके कौशिक अशी या दोघांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचीबाधा  झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


रविंदर पाल कोरोनाविरोधात लढत होते. अखेर आज लखनऊ येथे त्यांच निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. रविंदर पाल यांनी मॉस्को आणि लॉस एंजेलिस ऑलिम्पिकखेरीज सिंग यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी (१९८० आणि १९८३), रौप्य महोत्सवी १०-नेशन कप (हाँगकाँग १९८३), वर्ल्डकप (मुंबई, १९८२) अशा अनेक आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही प्रतिनिधित्व केले होते. १९७९मध्ये ज्युनियर विश्वचषक संघात त्यांचा समावेश होता करण्यात आला होता.


कौशिक यांच्या पत्नींनाही कोरानाची बाधा झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कौशिक यांनी हॉकीसाठी अमूल्य योगदान दिलं होतं. ते 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकच्या सुवर्ण पदक संघाचे सदस्य होते. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये हॉकीसाठीचे हे अखेरचे पदक ठरले. यानंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये हॉकीसाठी पदक मिळवता आलेले नाही. कौशिक यांनी प्रशिक्षक पदाचीही जबाबदारी चोखपणे पार पाडली होती. कौशिक ६६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा असे कुटुंब आहे. कौशिक यांना १७ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती.

Advertisement

IBPS IBPS test2 Highclonoid Softec Pvt Ltd