All News

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका

  • गुलेरिया यांचा इशारा; कडक टाळेबंदीची गरज

नवी दिल्ली, दि.४ मे : ’एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशाला सावधानतेचा मोठा इशारा दिला आहे. भारताला कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करावा लागणार आहे. नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊनचा काहीच फायदा नाही, असे नमूद करून डॉ. गुलेरिया यांनी देशाला अधिक काळ कडक टाळेबंदीची आवश्यकता असल्याचे सांगितले. 


कोरोना महामारी अशीच वाढत राहिली आणि इम्यून एस्केप मॅकेनिझ्म विकसित करण्यात यशस्वी झाल्यास भारताला कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, असे गुलेरिया यांनी म्हटले आहे. ’’कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पर्याप्त कालावधीसाठी टाळेबंदी करण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या त0ीन गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णालयातील वैद्यकीय सेवेत सुधारणा घडवून आणणे, कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणणे आणि लसीकरणाची मोहीम गतीमान करणे, या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. गर्दी कमी करण्यात यश आले, तरच देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल,’’ असे ते म्हणाले. 


सध्या वीकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यू लावण्याची काही गरज नाही. टाळेबंदी काही काळासाठी करावीच लागणार आहे. कोरोनाचा विषाणू ज्या पद्धतीने विकसीत होत आहे, त्यावरून देशात तिसरी लाट येण्याची शक्यता बळावली आहे. लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या 24 तासात 3 लाख 57 हजार 229 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 2 कोटी 02 लाख 82 हजार 833 पर्यंत पोहोचली आहेत. तर दुसरीकडे 3,449 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना मृतांचा आकडा हा 2 लाख 22 हजार 408 इतका झाला आहे. तसेच भारतातील कोरोनामुक्त होणार्‍यांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. काल दिवसभरात 3 लाख 20 हजार 289 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणार्‍यांची एकूण संख्या ही 1 कोटी 66 लाख 13 हजार 292 इतकी झाली आहे. तर सद्यस्थितीत राज्यात 34 लाख 47 हजार 133 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे. दरम्यान भारतात आतापर्यंत 15 कोटी 89 लाख 32 हजार 921 जणांना कोरोनाची लस घेतली आहे.

Advertisement

IBPS IBPS Highclonoid Softec Pvt Ltd test 4