All News

WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून, भारत- न्यूझीलंड संघ भिडणार

WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून, भारत- न्यूझीलंड संघ भिडणार

लंडन, दि. १८ जून : भारत-न्यूझीलंड दरम्यानआज  शुक्रवारपासून जागतिक कसोटी अजिंक्य पद स्पर्धेची अंतिम फेरी अर्थात कसोटी क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलचा थरार रंगणार आहे. या सामन्यात असे अनेक खेळाडू आहेत जे आतापर्यंत एकही विश्वचषक जिंकू शकले नाहीत. त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी विश्वचषकापेक्षा कमी नसेल. १८ ते २२ जूनदरम्यान हा सामना रंगणार असून इंग्लंडच्या साऊदेम्प्टन मैदानात तो खेळवला जाणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्सच्या इतर चॅनेलवर आज दुपारी ३ वाजेपासून पाहू शकता. विराट कोहली भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे, मात्र कोहलीला कर्णधार म्हणून एकही आयसीसी विजेतेपद भारताला मिळवून देता आले नाही. यामुळे विराट कोहली भारताला कर्णधार म्हणून आयसीसी विजेतपद मिळवून देणार का हे पाहणं महत्वाचे ठरेल. दरम्यान या अंतिम सामन्यापुर्वी दोन्ही संघानी आपला अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.

भारताचा अंतिम संघ 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा,अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी.

न्यूझीलंडचा अंतिम संघ 

केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम ब्लँडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉन्वे, कोलिन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लाथम, हेन्री निकोलस, इजाज पटेल, टिम साउदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग.

Advertisement

test2 IBPS test 4 Highclonoid Softec Pvt Ltd