All News

मधु मंगेश कर्णिक यांना जनस्थान पुरस्कार जाहीर

मधु मंगेश कर्णिक यांना जनस्थान पुरस्कार जाहीर

नाशिक, दि. ११ जानेवारी  : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. 


 १९९१ सालापासून जनस्थान पुरस्कार दिला जात आहे. येत्या १० मार्चला नाशिकला मधु मंगेश कर्णिक यांना पुरस्कार दिला जाणार आहे. एक लाख रूपये, सन्मानचिन्ह, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूपआहे. .


मधू मंगेश कर्णिक हे मराठीतील प्रसिद्ध कथाकार, कांदबरीकार, कवी, संवाद लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी भुषवले आहे. १९९० साली रत्नागिरीत झालेल्या ६४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले असून लाभसेटवाल पुरस्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारासह सात पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना मिळाले आहे. तसेच विविध साहित्य प्रकारात ५५ हून अधिक साहित्य प्रकाशित झाले आहे. 

Advertisement

test 4 Highclonoid Softec Pvt Ltd test2 IBPS