All News

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केला पराभव; सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केला पराभव; सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी

वॉशिंग्टन, दि. २४ नोव्हेंबर : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून डोनाल्ड ट्रम्प यांचा या निवडणुकीत पराभव झाला. तर जो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. पण निवडणुकीचे निकाल जाहिर झाल्यानंतरही आल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प आपल्या दाव्यावर अडून राहिले होते आणि आपला पराभव मान्य करण्यास तयार नव्हते. पण आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर सत्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे.


तीन ते चार आठवडे अमेरिकेतील निवडणुकाचे निकाल जाहिर होऊन उलटले असून आपल्या बाजूने निकाल येईल असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प वारंवार व्यक्त करत होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी निकाल आल्यानंतरही अनेकदा जो बायडेन आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षावर निशाणा साधला आहे. डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीचा निकाल स्पष्ट असतानाही अजिबात पराभव मान्य करत नव्हते. त्यांनी यासाठी कायदेशीर मार्ग देखील निवडला होता. पण तिथेदेखील त्यांच्या पदरी निराशाच पडली. अशा परिस्थितीत अखेर डोनाल्ड ट्रम्प पराभव मान्य करताना दिसत आहेत.

Advertisement

MahaExam IBPS Highclonoid Softec Pvt Ltd IBPS